S M L

'दांडीबहाद्दर सचिन आणि रेखाची खासदारकी रद्द करा'

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2014 02:49 PM IST

'दांडीबहाद्दर सचिन आणि रेखाची खासदारकी रद्द करा'

sachin and rekha08 ऑगस्ट : क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना घाम फोडणारा, विक्रमादित्य,भारतरत्न आणि खासदार अशी बहुमान मिरवणार्‍या सचिन तेंडुलकरची राजकीय इनिंग वादात सापडलीय. खेळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सचिनला राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली पण सचिन राज्यसभेत गैरहजर राहत असल्याचा सूर सदस्यांनी लगावला. सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखाच्या सततच्या गैरहजेरीचा मुद्दा सीपीएमचे खासदार पी. राजीवनी हा मुद्दा उपस्थित केला.

आतापर्यंत रेखा फक्त 5 वेळा तर सचिन केवळ तीन वेळा राज्यसभेत उपस्थित राहिलाय. यावर्षी सचिन राज्यसभेत एकही दिवस हजर राहिलेला नाहीय. एखादा सदस्य रीतसर रजा न घेता 60 दिवस गैरहजर राहिला तरच सदस्यत्व रद्द होतं, असं उपसभापती पी. जे. कुरियन यांनी स्पष्ट केलंय. सचिन आणि रेखाच्या बाबतीत असं नाही असंही त्यांनी सांगितलं.

मात्र राज्यसभेच्या सदस्यांनी सचिनच्या गैरहजेरीवर नाराजी व्यक्त केलीय.खासदारपद ही काही ट्रॉफी नव्हे , सचिनने सदनात आलं पाहिजे. ही एक मोठी जबाबदारी आहे त्यामुळे अनुपस्थिती योग्य नव्हे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दिली. तर आपल्यावर सोपवलेली जबाबदारी सचिनने पार पाडावी, संसदेत हजर राहणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी दिली.

तर सचिनच्या खासदारकीसाठी पुढाकार घेणारे काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी सचिनला आता काही जबरदस्ती करू शकत नाही अशी सावध प्रतिक्रिया दिली. सचिनला 2012 मध्ये खासदारकी देऊन सन्मान करण्यात आला होता. सचिनसोबतच रेखा यांनाही खासदारकी देण्यात आली होती. सचिनच्या खासदारकीचा कार्यकाळ हा 26 एप्रिल 2018 पर्यंत असणार आहे. पण सतत गैरहजर राहिल्यामुळे सचिनची खासदारकी रद्द करा अशी मागणी आता सदस्यांनी केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2014 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close