S M L

दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2014 04:02 PM IST

दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद सुरू

09 ऑगस्ट : भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची नवी दिल्लीत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राजनाथ सिंह हजर आहेत. भाजपच्या सरकार स्थापनेनंतरची ही पहिलीच बैठक आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यानंतर भाजपचे नवीन अध्यक्ष म्हणून अमित शाह आज अधिकृतरित्या कारभार हातात घेतील. या बैठकीला देशभरातले भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.

देशाच्या आर्थिक विकासाचा आराखडा, पक्ष बळकट करणं, तसचं महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि दिल्लीत होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती या सगळ्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, लालकृष्ण आडवाणी हे देखील संबोधित करणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2014 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close