S M L

महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्त्वाखाली सत्ता येईल - अमित शाह

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2014 03:24 PM IST

महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्त्वाखाली सत्ता येईल - अमित शाह

09 ऑगस्ट : महाराष्ट्रात काँग्रेसच्या गेल्या 15 वर्षांच्या सत्तेनंतर आता मात्र तिथली जनता भाजपचे सरकार निवडून देण्याची इच्छा दाखवत आहे, यावेळी महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार निवडून येईल असा दावा भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय बैठकीला दिल्लीत सुरुवात झालीय. या बैठकीत अमित शाह यांनी भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी अध्यक्ष राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते या परिषदेला हजर आहेत. या परिषदेत बोलताना अध्यक्ष अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. जनतेने काँग्रेसला नाकारलं असून, विरोधी पक्षाचंही स्थान त्यांना दिलेलं नाही अशा शब्दांत अमित शाहांनी काँग्रेसवर टीका केलीय. सोबतच विधानसभा निवडणुकांसाठीची रणनीतीही अमित शाहांनी स्पष्ट केलीय.

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागा जिंकत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का दिला होता. आपला पक्ष मजबूत बनविला पाहिजे, निवडणुका कधीही झाल्या तरी आपणच सत्तेत आलो पाहिजे, पंचायतीपासून ते संसदेपर्यंतची प्रत्येक निवडणूक आपण गांभीर्याने घेतली पाहिजे असं अमित शाह म्हणाले आहेत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यांमध्ये भाजप सत्तेत येणं खूप महत्त्वाचं आहे असं ही ते म्हणालेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2014 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close