S M L

15 ऑगस्टला मोदींचे भाषण यू ट्यूबवर लाईव्ह

Samruddha Bhambure | Updated On: Aug 11, 2014 01:39 PM IST

15 ऑगस्टला मोदींचे भाषण यू ट्यूबवर लाईव्ह

11  ऑगस्ट : टेक्नोसेव्ही पंतप्रधान म्हणून सर्वश्रूत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरही याची छाप असणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचे लाल किल्ल्यावरील पहिलेवहिले भाषण यू ट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच जनतेला संबोधीत करणार आहेत. पंतप्रधान मोदींचे हे भाषण उत्स्फुर्त असणार असून यात ते काय बोलतील याविषयी कमालीची उत्सुकता आहे. मोदींनीही या भाषणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. मोदींचे हे भाषण यू ट्यूबवर लाईव्ह बघता येणार आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला यू ट्यूबवर मिळालेला चांगल्या प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तब्बल 100 जणांची टीम दिल्लीत तळ ठोकून आहे. या प्रक्षेपणासाठी 14 कॅमेरे लावण्यात येणार आहेत. मात्र प्रेक्षकांमध्ये बसलेल्या व्हीआयपींना मोदींच्या भाषणाची प्रत दिली जाणार नाही असे समजते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2014 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close