S M L

गौतम बुध्दांची 2566 वी जयंती बुध्द विहारात साजरी

9 मे, नागपूरकल्पना नळसकरजगाला प्रज्ञा, शील, करूणा हा संदेश देणार्‍या आणि शांती, त्यागाचं प्रतीक असणार्‍या गौतम बुध्दांची आज 2566 वी जयंती दीक्षा भूमीत साजरी केली जात आहे. इ. स. पूर्व 500 ते 600 हा त्यांचा जीवनपट. मनुष्या प्रमाणेच पशू पक्षी यानांही समानतेने वागवावं, चोरी - लबाडी करू नये, कामवासनांपासून अलिप्त राहवं, खोटं बोलू नये आणि व्यसनांपासून अलिप्त राहवं या पंचशील तत्वांची त्यांनी शिकवण दिली. बुद्धांची विचारसरणी आत्मसात करणारे त्यांचे अनुयायी, भन्ते आणि बुद्धबांधवांनी दीक्षाभूमीवर आजपासून सुरू झालेल्या बुद्ध महोत्सवाला नागपूरच्या बुध्द विहारात गर्दी केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दिक्षा जिथे घेतली ती दिक्षाभूमी सर्वांच्या परिचयाची आहे. पण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुध्द यांचं जपानी पध्दतीनं बांधलेलं विश्वविख्यात बुध्द विहार नागपूर जिल्ह्यात आहे. हे बर्‍याच लोकांना माहित नाही. त्याच ड्रॅगन पॅलेस टेम्पलची आज गौतम बुध्दांच्या जयंतीनिमित्ताने ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.नागपूरपासून 25 किलोमिटर अंतरावर असलेल्या कामठीमधलं हे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस. बौध्द पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी इथं येतात. राहूल वानखेडे तर गेल्या 5 वर्षापासून इथं येतात. भगवान बुध्दांनी शांतीचा संदेश दिला आहे. ती शांती इथ मिळते. संपूर्ण देशामध्ये जपानी पद्धतीनं बांधलेलं हे एकमेव बौध्द विहार आहे. हे बांधण्याचा उद्देश असा की जपाननी बुध्द धर्माचा स्वीकार भारतातून केला आणि नंतर तोच पुढे नेला. त्यामुळे भारतात गौतम बुध्दांच्या स्मृतिप्रित्यर्थ काही तरी राहवं. ही बुध्द मूर्तीसुध्दा जपानचीच आणि ती अखंड चंदनाने तयार केलेली आहे. तिचं वजन 864 किलो इतकं आहे. ड्रॅगन पॅलेसमध्ये असलेल्या या गौतम बुध्दांच्या मूर्तीचं खास असं वैशिष्ट म्हणजे दुपारी या विहाराच्या कोणत्याही कोपर्‍यातून ही मूर्ती पाहिली तर तिचे डोळे उघडे दिसतील. पण रात्री जर तुम्ही ही मूर्ती पाहिली तर तिचे डोळे तुम्हाला बंद दिसतील. हा नयनरम्य आविष्कार या बुध्द विहारातल्या ड्रॅगन पॅलेसचा अनमोल ठेवा आहे. आज बुध्द विहारातल्या या ड्रॅगन पॅलेसची किमया लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या वास्तूला भेट दिली आणि भगवान बुध्दांच्या प्रतिमेसमोर लीन होऊन गौतम बुध्दांची 2 हजार 566 वी जयंती साजरी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2009 02:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2009 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close