S M L

आझम खान आणि जयाप्रदा यांच्यातला वाद चिघळला

11 मेसमाजवादी पार्टीत जयाप्रदा आणि आझमखान यांच्यातल्या वादाने आता गंभीर वळण घेतलं आहे. आझम खान आपले अश्लील पोस्टर्स वाटत असल्याचा आरोप जयाप्रदा यांनी केला आहे. सीएनएन आयबीएनला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे. तसंच याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही जयाप्रदा यांनी म्हटलंय. जयाप्रदा उत्तरप्रदेशामधून समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवताहेत. आझमखान यांच्यामागे असलेली मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता समाजवादी पक्षाला इथे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र आझमखान यांची पकड असलेल्या रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा यांना उमेदवारी दिल्यामुळे आझमखान पक्षावर नाराज आहेत. आता तर आझम खान यांनी उघडपणे रामपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या असं आवाहन करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे समाजवादी पार्टीतले अंतर्गत वादही आता बाहेर येऊ लागले आहेत. अमरसिंग आणि आझमखान यांच्यातल्या वादांनी आता आणखीनच गंभीर रुप धारण केलंय. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या धामधुमीत उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये आरोप -प्रत्यारोपांची राजकीय खेळी सुरू आहे. अशा वेळी मूळ वादाचं कारण इतर काहीही नसून केवळ कल्याण सिंह आहे अशी भूमिका आझमखान यांनी मांडली आहे. कल्याण सिंह यांनी आमच्याशी बातचीत केली असता आम्हाला आपसात चर्चा करून अंतर्गतवाद सोडवता आले असते असं आझमखान यांनी स्पष्ट केलं आहे. आझमखान यांनी मतदानाच्या पाश्‍र्वभूमीवर केलेलं वक्तव्याचं कारण हे सध्या उत्तरप्रदेशामध्ये मतदारसंघात घडणार्‍या घडामोडींमुळे त्यांना वाटणारी असुरक्षितता आणि राजकीय अस्थिरता असल्याचं सांगण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2009 09:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2009 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close