S M L

मोदी सरकारकडे कोणतीही नवीन धोरणं नाहीत - सोनिया गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 13, 2014 04:11 PM IST

sonia_gandhi_congress_meet

13  ऑगस्ट :  नरेंद्र मोदी सरकारकडे कोणतीही नवीन धोरणं नाहीत, काँग्रेसनं केलेलं कामच पुढे नेत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.  मात्र काँग्रेस भाजपच्या या कृतीचे स्वागत करत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारकडे कोणतीही नवे धोरण नाही. ते यूपीए सरकारचेच धोरण पुढे नेत आहेत ज्याचा त्यांनी कधीकाळी विरोध केला होता अशी आठवण सोनिया गांधींनी करुन दिली.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जातीय हिंसाचार वाढला आहे, त्यामुळे काँग्रेसला पुन्हा सक्रिय होण्याची गरज आहे. लोकसभेत झालेल्या पराभवावर विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीला आम्ही एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत. आपल्यातले मतभेद दूर करून एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यामुळे आपापल्या मतदारसंघात जाऊन भाजपचं पितळ उघडं पाडा अशी सूचनाही सोनियांनी आपल्या खासदारांना दिली आहे. लोकसभेत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संघर्ष करावा लागणार आहे. पण, आम्ही राज्यसभेत पुरेसे संख्याबळ असल्याने सरकारविरोधात आवाज उठवू, असंही सोनिया गांधी म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी मंगळवारी केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतानाही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. आता आज सलग दुसर्‍या दिवशी त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

दरम्यान, लोकसभेचं आजचं कामकाज सुरू होताच काँग्रेसने जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावर चर्चेची मागणी केली. त्याबाबत काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून विनंतीही केली होती. पण आधी प्रलंबित विधेयकांवर चर्चा करू, मग दुपारी यावर चर्चा करू, अशी भूमिका लोकसभा अध्यक्षांनी घेतली. त्यावर काँग्रेसच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. चर्चा आताच व्हावी, असा आग्रह त्यांनी धरला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2014 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close