S M L

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अधिकारांवरही मोदींची गदा?

Samruddha Bhambure | Updated On: Aug 13, 2014 03:53 PM IST

rajnatha_and_modi

13  ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अधिकारांवरही मोदींनी गदा आणली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या आणि नियुक्तीचा निर्णय आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या आणि नियुक्तीचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती घेत असते. ही समिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना प्रस्ताव पाठवते. पण, यापुढे ही समिती थेट पंतप्रधान कार्यालयाला प्रस्ताव पाठवेल आणि पीएमओच्या मंजुरीनंतर तो गृहमंत्रालयाकडे पाठवला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे स्वाक्षरी करण्याची केवळ औपचारिकता आता गृहमंत्री पार पाडतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राजनाथ सिंह यांनी मात्र या सर्व मुद्द्यांवरून सारवासारव केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2014 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close