S M L

पेड न्यूज प्रकरणी चव्हाणांना दिलासा, दिल्ली कोर्टाचा निर्णय 'जैसे थे' !

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2014 10:19 PM IST

Image asok_chavan_on_election_300x255.jpg13 ऑगस्ट : पेड न्यूज प्रकरणी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाचा निर्णय बदलायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

कोर्टाने चव्हाणांना दिलासा देत या प्रकरणी 15 दिवसात निर्णय घ्या, असे आदेशही दिल्ली हायकोर्टाला दिले आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीचा खर्च अयोग्य पद्धतीने दाखवल्याबद्दल निवडणूक आयोगाने चव्हाणांना नोटीस बजावली होती. आयोगाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला अशोक चव्हाण यांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2014 10:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close