S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले ठळक मुद्दे

Samruddha Bhambure | Updated On: Aug 15, 2014 03:00 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले ठळक मुद्दे

15 ऑगस्ट :  स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी बलिदान दिलं, त्यांना मी वंदन करतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या पहिल्या वहिल्या भाषणाची सुरूवात केली. आज भारताचा 68 वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी, तिन्ही दलांनी पंतप्रधानांना सलामी दिली. तसचं, पंतप्रधानांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन सन्मानित करण्यात आलं. कुठल्याही सुरक्षेशिवाय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं. उस्त्फूर्त, तडफदार, भारतीयांना स्वप्नं दाखवणारं मोदींचं भाषण एक तासापेक्षा जास्त वेळ झालं. तसचं जवाहरलाल नेहरूंच्यानंतर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी सगळ्यात जास्त वेळ भाषण करण्याचा विक्रम आज नरेंद्र मोदींनी केला.

 •  'लवकरच नियोजन आयोगाच्या जागी नवीन संस्था स्थापणार'
 • 'नियोजन आयोगाचं रूप पालटण्याची गरज'
 • '11 ऑक्टोबरला खासदार ग्राम योजनेची ब्लू प्रिंट सादर करणार'
 • 'प्रत्येक खासदाराने किमान 5 आदर्श गावं घडवावीत'
 • 'CSR मधून शाळांमध्ये कंपन्यांनी शौचालयं बांधावीत'
 • खासदार आदर्श ग्राम योजनेची घोषणा
 • 'प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी वेगळी शौचालयं असावीत'
 • देशभरात शौचालयं उभारणं गरजेचं - पंतप्रधान मोदी
 • महिलांना सन्मान देणं आपलं कर्तव्य - पंतप्रधान मोदी
 • डिजिटल इंडिया जगाची बरोबरी करू शकतो
 • ई गर्व्हनन्सच्या मार्फत सुशासन आणणार
 • 'लवकरच नियोजन आयोगाच्या जागी नवीन संस्था स्थापणार'
 • माझ्या देशाला कोणतीही गोष्ट आयात करावी लागू नये - पंतप्रधान मोदी
 • भारत जगभरात निर्यात करणारा देश बनू शकतो - पंतप्रधान मोदी
 • भारत जगभरात निर्यात करणारा देश बनू शकतो
 • 'मेड इन इंडिया'चा नारा जगभरात पोहोचावा
 • भारतात उत्पादन करण्याचं मोदींचं आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आवाहन
 • प्रत्येक अकाऊंटसोबत डेबिट कार्ड आणि विमा मिळणार
 • प्रत्येक गरीब कुटुंबाला 1 लाखाचा विमा मिळणार
 • डिजिटल इंडिया जगाची बरोबरी करू शकतो
 • 'जन धन' योजनेची घोषणा
 • 'आपल्या तिजोर्‍या भरण्यासाठी स्त्रीभ्रूण हत्या करू नका'
 • मुलगी आयुष्यभर आई-वडिलांची सेवा करते - पंतप्रधान मोदी
 • 'मातेच्या गर्भात वाढणार्‍या मुलीला मारू नका'
 • 'देशात शांती, समृद्धी, सद्भाव, बंधुभाव नांदू शकेल'
 • 'राष्ट्रकल्याणाची गती वाढवेन याचा मला विश्वास आहे'
 • 'स्वप्नातला भारत घडवण्याची जबाबदारी आपली आहे'
 • हिंसेचा रस्ता सोडा आणि बंधुभावाने वागा
 • आपला मुलगा कुठे जातो हे विचारायला हवं
 • आपलं रक्षण करणार्‍या जवानांना वंदन
 • 'मी पंतप्रधान म्हणून नाही, तर प्रधान सेवक म्हणून आलोय'

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2014 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close