S M L

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, 20 जणांचा बळी

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2014 01:55 PM IST

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, 20 जणांचा बळी

16 ऑगस्ट : मागील वर्षी उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजावला होता त्याचा आठवणी पुन्हा ताज्या होण्याची चिन्ह आहे. उत्तराखंडमध्ये पौरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 20 जणांचा जीव गेलाय. तसंच ढगफुटी आणि दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी चॉपरची व्यवस्था करण्यात आली होती. पण खराब हवामानमुळे हे हेलिकॉप्टर डेहराडूनहून निघूच शकलेलं नाही. गंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतेय. तर हिमाचल प्रदेशात रस्ते वाहतूक कोलमडल्याने शिमल्यामध्ये हजारो पर्यटक अडकलेले आहेत. पावसामुळे सफरचंदाच्या बागांचं आणि इतर पिकांचं नुकसान झालंय.

(सविस्तर बातमी लवकरच)

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2014 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close