S M L

अमित शाहांची नवी टीम जाहीर, वरूण गांधींचा पत्ता कट

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2014 02:26 PM IST

346_amit shah16 ऑगस्ट : भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अमित शाह यांनी आता आपली टीम आखली आहे. अमित शाह यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाची फेररचना केली आहे. पण यात फारसे बदल करण्यात आले नाही. मागची टीमच कायम ठेवण्यात आलीय.

पण अमित शाहांच्या नव्या टीममध्ये उपाध्यक्ष म्हणून बी. एस. येडीयुरप्पा यांचा सहभाग करण्यात आला आहे. तर वरुण गांधींचा पत्ता कट करण्यात आलाय.

जनरल सेक्रेटरीपदी राजीव प्रताप रूडी, राम माधव, जे पी नड्डा यांचासह मुरलीधर राव, सरोज पांडे, भुपेंद्र यादव, रामशंकर कथेरिया, राम लाल यांची निवड करण्यात आली आहे. तर महिला मोर्चाच्या अध्यक्षापदी औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांची निवड करण्यात आली.

अशी आहे अमित शाह यांची नवी टीम जाहीर

उपाध्यक्ष - बंडारू दत्तात्रय, बी. एस. येडीयुरप्पा, सत्यपाल मलिक, मुख्तार अब्बास नक्वी, पुरूषोत्तम पुरला, प्रभात झा, रघुवर दास, किरण महेश्वरी, विनय सहस्त्रबुद्धे, रेणू देवी, दिनेश शर्मा

जनरल सेक्रेटरी - राजीव प्रताप रूडी, राम माधव, जे पी नड्डा, मुरलीधर राव, सरोज पांडे, भुपेंद्र यादव, रामशंकर कथेरिया, राम लाल

जॉईंट सेक्रेटरी - व्ही. सतिश, शौदान सिंग, शिव प्रकाश, बी. एल. संतोष

सेक्रेटरी - श्याम जाजू, डॉ. अनिल जैन, एच. राजा, रोमेन डेका, सुधा यादव, पूनम महाजन, रामवचिार नेतम, अरूण सिंग, सिद्धार्थ नाथ सिंग, सरदार आर पी सिंग, श्रीकांत शर्मा, ज्योती ध्रवे, तरूण चुघ, रजनिश कुमार

प्रवक्ते - शाहनवाझ हुसेन, मीनाक्षी लेखी, सुधांशु त्रिवेदी, एम. जे. अकबर, नलीन कोहली, अनिल बालुनी, जे. व्ही. एल. नरसिंह राव, विजय सोनकर शास्त्री, ललिता कुमार मंगलम, संबीत पत्रा

- महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

- युवक मोर्चाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची पुर्ननिवड

- एस.सी. मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत के आर गौतम

- एस. टी. मोर्चाचे अध्यक्ष फग्गन सिंग कलुष्टे

- अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष अब्दुल राशीद अन्सारी

- ऑफिस सेक्रेटरी - अरूण कुमार जैन

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2014 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close