S M L

मोहन भागवतांनी दिला पुन्हा हिंदू राष्ट्राचा नारा

Samruddha Bhambure | Updated On: Aug 18, 2014 01:28 PM IST

मोहन भागवतांनी दिला पुन्हा हिंदू राष्ट्राचा नारा

18 ऑगस्ट :  हिंदुस्तान हे हिंदूंचं राष्ट्र आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती महोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

'हिंदू धर्मामध्ये इतर धर्मांनाही समाविष्ट करून घेण्याची क्षमता आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत सर्व हिंदूंमध्ये समानतेचे काम करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदुस्तान हे हिंदूंचं राष्ट्र तर हिंदुत्व ही आपल्या देशाची ओळख असल्याचंही भागवत म्हणालेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2014 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close