S M L

सरकार कोणाचं...? : 1 हजार कोटींचा सट्टा लावला गेल्याची शक्यता

13 मे,अजित मांढरे 16 मे आधी सट्टेबाजार तेजीत आलाय. 5 व्या टप्प्यातलं मतदान आज होतंय. पण त्याआधीच राजकीय पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. निवडणुकीचा निकाल 16 मे ला जाहीर होईल. मात्र पंतप्रधान कोण असणार, कोणाचं सरकार स्थापन होणार, आणि कोण असेल किंग मेकर याच्यावर 1 हजार कोटींपेक्षा जास्त सट्टा खेळला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.कोणाला मिळतील सर्वात जास्त जागा...सत्ता कोणाची येईल...कोण पंतप्रधान होईल...किंग मेकर कोण ठरेल...संपूर्ण देशाला हे प्रश्न पडलेत. या प्रश्नांची उत्तरं मिळतील 16 मे ला. पण हा निकाल जाहीर होण्याआधीच या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत सट्टेबाजांकडे. यंदाच्या निवडणुकीत 1 हजारपेक्षा जास्त सट्टा खेळला जातोय. बुकींनी जाहीर केलेल्या रेटकार्डनुसार पंतप्रधानपदासाठी 1 रूपयाला लावलेला रेट मनमोहन सिंग 1 रुपये 15 पैसे...लालकृष्ण अडवाणी 2 रूपये 10 पैसे...शरद पवार 5 रूपये...मुलायम सिंग यादव 16 रूपये...प्रकाश करात 50 रूपये...जयललिता 60 रूपये...मायावती 130 रूपये असा आहे. बुकींच्या मते यावेळीही जनता युपीएलाच कौल देईल. युपीएला 140 ते 160 जागा मिळतील त्यानुसार एका रूपायाला 40 पैसे ते अडीच रुपये सट्टा युपीएवर खेळला जातोय. तर 125 ते 140 जागा एनडीएला मिळतील आणि त्यानुसार 90 पैसे ते 5 रूपये पर्यंतचा सट्टा एनडीएवर खेळला जातोय. तिसर्‍या आघाडीला 40 ते 60 जागा मिळतील. त्यानुसार 15 पैसे ते 1 रूपया 10 पैसे सट्टा तिसर्‍या आघाडीवर खेळला जातोय. महाराष्ट्रात युतीला सर्वात जास्त 25 जागा, काँग्रेस आघाडीला 13 ते 15 , तर 4 ते 5 जागा अपक्षांना मिळतील, असं बुकींना वाटतंय. मंुबईतून भाजपचे राम नाईक, किरीट सोमय्या, सेनेचे मोहन रावले, तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना बुकींची पसंती आहे. ठाण्यातून राष्ट्रवादीचे संजीव नाईक तर कल्याणमधून शिवसेनेचे आनंद परांजपे निवडून येतील असा बुकींचा अंदाज आहे. पण बसपा आणि मनसे सगळ्या राजकीय पक्षांना तोंडात बोटं घालायला लावतील असही बुकींना वाटतंय. मनमोहन सिंग- 1 रुपये 15 पैसेलालकृष्ण अडवाणी- 2 रूपये 10 पैसेशरद पवार - 5 रूपयेमुलायमसिंग यादव- 16 रूपयेप्रकाश करात -50 रूपयेजयललिता- 60 रूपयेमायावती- 130 रूपये

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2009 07:32 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2009 07:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close