S M L

पाकला दणका, भारताकडून सचिव स्तरावरची चर्चा रद्द

Sachin Salve | Updated On: Aug 18, 2014 10:26 PM IST

पाकला दणका, भारताकडून सचिव स्तरावरची चर्चा रद्द

ind vs pak18 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणारी प्रस्तावित सचिव पातळीवरची चर्चा भारताने रद्द केली आहेत. 25 ऑगस्टला इस्लामाबादमध्ये ही चर्चा होणार होती.

मात्र, त्यापूर्वी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरमधल्या फुटीरवादी हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं. त्यामुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, पाकिस्तान अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप परराष्ट्र खात्याने केला.

पाकिस्तानने एक तर भारत सरकारशी बोलणी करावीत नाही तर फुटीरवाद्याशी असा पर्याय भारताने ठेवला. मात्र, पाकिस्तानने तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारताने चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी हुरियतच्या नेत्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. याचा भारताच्या राजकीय वर्तुळात निषेध व्यक्त होत आहे. यामुळे भारताने पाकिस्तानशी होणारी परराष्ट्र सचिव पातळीची बोलणी रद्द केली आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरूद्दीन यांनी दिली.

तर जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचा आरोप संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2014 10:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close