S M L

युपीत 60 वर्षीय नराधमाचा 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Aug 18, 2014 10:50 PM IST

rape18 ऑगस्ट : उत्तरप्रदेशमध्ये गाझियाबाद इथं लोनी भागात एका 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 60 वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

त्यामुळे संतप्त स्थानिकांनी पोलिसांच्या वाहनाची मोडतोड केली आणि गाडी पेटवून दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल करून न घेता पोलिसांनी फक्त विनयभंगाची तक्रार नोंदवून घेतल्याचा आरोप या पीडित मुलीच्या घरच्यांनी केलाय.

तर बाललैंगिक शोषण विरोधी कायद्या अंतर्गत काही कलमं लावल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही पीडित मुलगी आणि आरोपी वेगवेगळया जातीचे आहेत.

या आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. या परिसरात कलम 144 लावण्यात आलं असून, परिस्थिती चिघळू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2014 08:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close