S M L

काँग्रेसवर नामुष्की, विरोधी बाकही मिळेना !

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2014 09:29 PM IST

sonia_gandhi_congress_meet19 ऑगस्ट : स्वातंत्र्यानंतर चार दशकांहून अधिक काळ सत्तेत राहणार्‍या देशातला सर्वात मोठा असलेल्या काँग्रेस पक्षावर चांगलीच नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसला आता लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय.

लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यास नाकारलंय. काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नाही त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देता येणार नाही असं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केलंय.

सलग दोन टर्म सत्तेचा अनुभव घेणार्‍या काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पानिपत झालं. काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या. आपल्या पारड्यात विरोधीपक्ष नेतेपद मिळावं यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले.

एवढंच नाहीतर विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराही दिलाय. मात्र आता लोकसभा अध्यक्षांनीच नकार दिल्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय. मात्र विरोधीपक्षनेतेपद कुणाकडे जाणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close