S M L

प्रशासकीय यंत्रणेची सगळी सूत्रं आता पंतप्रधानांच्या हाती?

Samruddha Bhambure | Updated On: Aug 20, 2014 04:58 PM IST

प्रशासकीय यंत्रणेची सगळी सूत्रं आता पंतप्रधानांच्या हाती?

20  ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावरची पकड आता आणखी घट्ट झाली आहे. कारण प्रशासनावर आता मोदींचा थेट अंकुश राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रशासकीय नियुक्त्या आणि कारभाराची सूत्रं आता पंतप्रधानांच्या हाती राहणार आहेत. अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या, भ्रष्टाचारविरोधी धोरण, आरटीआयअंतर्गत उत्तर यासारखे अधिकार मोदींनी आपल्याकडे घेतलेत. काही दिवसांपूर्वी मोदींनी महत्त्वाच्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्यांचा अधिकार स्वत:कडे घेतला होता.

पंतप्रधान मोदींनी कोणकोणते अधिकार स्वत:कडे घेतलेत?

  • सीव्हीसी, लोकपालमधल्या सर्व नियुक्त्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द अंतिम राहणार
  • इतकंच नाही तर आयएएस आणि आयपीएसना कोणतं केडर द्यायचं हेसुद्धा पंतप्रधान मोदी ठरवणार
  • भ्रष्टाचारविरोधी धोरण मोदी ठरवणार
  • आरटीआयअंतर्गत माहिती देण्याबाबतचा निर्णयही पंतप्रधान घेणार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2014 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close