S M L

मनोहर जोशींनी दिला पवारांना पाठिंबा

13 मे एनडीएला बहुमत न मिळाल्यास पवारांना पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकतो असं वक्तव्य मनोहर जोशी यांनी केलं आहे. मनोहर जोशींच्या या वक्तव्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीबरोबर येऊ शकते असे संकेत मिळालेत. काल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं बोलणं झाल्याची चर्चा होती. आणि आज मनोहर जोशी यांनी केलेलं वक्तव्य पाहता शिवसेनेच्या मनात राष्ट्रवादीशी जुळवून करणं आहे, असं स्पष्ट होत आहे. पण काही दिवसांपूर्वी आयबीएन लोकमतला माहिती देताना मनोहर जोशी म्हणाले होते की, आमचे उमेदवार हे लालकृष्ण अडवाणी आहेत आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या पंतप्रधान पदाला आमचा पाठिंबा राहील. यावेळी भाजपनं जर सत्तेवर आल्यावर विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावली तर शिवसेनाही विरोधी पक्षात बसणार का, असाही प्रश्न भाजपला विचारला होता. त्यावेळी मनोहर जोशी यांनी भाजपबरोबर शिवसेना विरोधी पक्षात बसेल, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. पण मनोहर जोशींनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं आहे, त्यावरून शिवसेनेने फक्त भाजपला निवडणूक काळापुरता पाठिंबा दिला होता, असं स्पष्ट होतं. एनडीएच्या लुधियानातल्या महारॅलीत असणारा शिवसेनेचा सहभाग हा फक्त दिखावा होता, हाही मुद्दा लक्षात आला. तर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये दिलजमाई होत असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मनोहर जोशींनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजपची प्रतिक्रिया मौन आहे. मनोहर जोशींनी जे वक्तव्य केलं आहे, ते आमच्यापर्यंत काही आलेलं नाही. त्यामुळे आम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्रातले प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली आहे. मनोहर जोशींनी केलेलं वक्तव्य जेव्हा आयबीएन-लोकमतनं जेव्हा माधव भंडारींना ऐकवलं तेव्हा माधव भंडारी म्हणाले, ' शरद पवारांच्या जास्त जागा आल्या तरच राष्ट्रवादीला पाठिंबा दिला जाईल, असं वक्त्तव्य मनोहर जोशींनी केलं आहे. मनोहर जोशींच्या या बोलण्याचं मी स्वागत करतो. कारण पूर्ण देशामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने 58 जागांवर लढवल्या आहेत आणि त्यातल्या 33 जागा काँग्रेसच्या विरोधात लढवल्या आहेत. आता यावरून शरद पवारांच्या बहुत ज्यादा म्हणजे किती निवडून येतील, हाही एक प्रश्न आहे. म्हणजे मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाच्या दाव्याचा फोलपणावर इंगीत केलं आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. त्यातून कोणत्याही प्रकारचा अर्थ काढण्याची गरज आम्हाला भासत नाही.' प्रत्यक्षात सेना-भाजपमध्ये जेव्हा जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा भाजपनं नमतं घेतलं आहे. आताच्या निवडणुकांच्या जागा वाटपामध्ये शिवसेना जशी भाजपला वळवत होती, तसा भाजप वळत होता. कारण महाराष्ट्रात शिवसेना स्ट्राँग आहे. यावरूनच शिवसेनेच्या विरोधात भाजप कधीही बोलणार नाही,हे स्पष्ट होत आहे. मनोहर जोशींनी राष्ट्रवादीच्या बाजूने केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार यांना विचारलं असता, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या संपर्कात नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ' शिवसेनेची भूमिका रोज बदलते.त्यामुळे भूमिका नक्की झाली की प्रतिक्रिया देवू,अशी प्रतिक्रिया आर. आर. पाटील यांनी मनोहर जोशींच्या विधानावर दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2009 04:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2009 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close