S M L

बेपत्ता जवानाचं पार्थिव 18 वर्षांनंतर सापडलं

Sachin Salve | Updated On: Aug 20, 2014 10:55 PM IST

बेपत्ता जवानाचं पार्थिव 18 वर्षांनंतर सापडलं

20 ऑगस्ट : सियाचीनमध्ये तब्बल 18 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या जवानाचं पार्थिव सापडल्याची घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी गया प्रसाद हा जवानाचं पार्थिव तब्बल 18 वर्षांनी सापडलंय.

18 वर्षांपूर्वी 15 राजपूत बटालियनकडून सियाचीनमध्ये पोस्टिंगवर होते. उंच भागात संरक्षण करणार्‍या जवानांना विमानाद्वारे खाद्यपदार्थांची पार्सल्स देण्यासाठी ते गेले होते. इतके वर्षं त्यांचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने घरच्यांनीही गया प्रसाद यांचा मृत्यू झाल्याचं गृहित धरलं होतं.

काल खांदा -डोलमा दरम्यान असलेल्या गस्तीपथकाला हे पार्थिव आढळून आलं. गयाप्रसाद यांचं पार्थिव त्यांच्या कुटंुबियांकडे आज सोपावण्यात आलं, त्यामुळे एकाच वेळी दु:ख आणि अभिमानाची भावना कुटुंबियांमध्ये होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2014 10:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close