S M L

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात झारखंडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2014 06:23 PM IST

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात झारखंडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

21 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घोषणेबाजीमुळे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अडचणींना सामोरं जाव लागतं आहे. हरियाणा आणि सोलापूर पाठोपाठ झारखंडमध्येही पंतप्रधानांच्या कार्यक्रमात दुसर्‍या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय.

नरेंद्र मोदी आज रांचीमध्ये एका पॉवरग्रीडच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमामध्येही भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाचा जयजयकार केला. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेमंत सोरेन यांचं भाषण सुरू असताना मोदी-मोदीच्या घोषणा भाजप समर्थकांनी दिल्या. त्यामुळे सोरेन यांना आपलं भाषण थांबावं लागलं. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2014 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close