S M L

लोकसभेत विरोधी पक्षनेता का नाही? : सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Aug 22, 2014 04:48 PM IST

लोकसभेत विरोधी पक्षनेता का नाही? : सुप्रीम कोर्ट

22 ऑगस्ट :  विरोधी पक्ष नेतेपदाबाबत सुप्रीम कोर्टाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. लोकसभेत विरोधी पक्षनेता का नाही? याची विचारणा सुप्रीम कोर्टाने सरकारकडे केली आहे. विरोधी पक्षनेता नसेल तर लोकपालाची नियुक्ती कशी होणार? असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारलाय. यावर तोडगा शोधण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने ऍटर्नी जनरलना दिले आहेत. यापूर्वी संसदेत विरोधी पक्षनेता नसण्याची परिस्थिती उद्भवली नव्हती असं म्हणत सुप्रीम कोर्टाने सरकारला उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांचा अवधी दिला आहे.

लोकपालच्या नियुक्तीसाठी विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असून विरोधी पक्षनेता नसेल तर लोकपालाची नियुक्ती कशी होणार? असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारला आहे. विरोधी पक्षनेता सत्ताधार्‍यांपेक्षा वेगळी भूमिका मांडू शकतो आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेता असणे गरजेचे असते असे मतही सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. विरोधी पक्षनेतेपदाबाबत सुप्रीम कोर्टाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

लोकसभेत विरोधी पक्षनेता का नाही? विरोधी पक्षनेता नसेल तर लोकपालची नियुक्ती कशी होणार ? असा सवाल करत यावर केंद्र सरकारला तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचंही कोर्टाने सांगितलं आहे. यासाठी कोर्टाने केंद्र सरकारला 4 आठवड्यांचा अवधी दिला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद नसल्याने लोकपाल नियुक्ती प्रक्रियाही रखडली आहे. यावरूनच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2014 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close