S M L

इरोम शर्मिला यांना पुन्हा अटक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 22, 2014 03:26 PM IST

इरोम शर्मिला यांना पुन्हा अटक

22 ऑगस्ट : सैन्याच्या विशेषाधिकाराविरोधात लढणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना आज मणिपूर पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली होती. सुटका झाल्यावर इरोम यांची प्रकृती अजून खालावणार नाही याची खबरदारी राज्य सरकारनी घ्यावी, असं कोर्टानं म्हटलं होतं. इरोम शर्मिला यांनी वैद्यकीय तपासणीला विरोध केल्यानं त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 14 वर्षांपासून अटकेत असलेल्या इरोम यांची दोनच दिवसांपूर्वी कोर्टानं सुटका केली होती. सुटका झाल्यावरही इरोम यांचं उपोषण सुरूच आहे.

इरोम शर्मिला यांनी वैद्यकीय तपासणीला विरोध केल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेला इरोम आणि त्यांच्या आईचा विरोध होता. पोलिसांनी अटक करताना इरोम आणि त्यांच्या समर्थकांना धक्काबुक्कीही केली. परवा सुटका झाल्यापासून इरोम शर्मिला त्यांच्या वैद्यकीय तपासणीला विरोध करतायेत. सध्या इरोम शर्मिलांना जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. पण त्यांना कोर्टात हजर केल्याशिवाय पोलीस त्यांना 24 तासांपेक्षा जास्त काळ अटकेत ठेवू शकत नाहीत. कोर्टामध्ये पोलीस पुन्हा एकदा इरोम शर्मिलांवर (कलम 309) आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप दाखल करतील.

इरोम शर्मिला गेली 14 वर्षं उपोषण करत आहेत. त्यांना नळ्यांद्वारे जबरदस्तीने अन्न देण्यात येत होतं. त्यामुळे त्या गेली अनेक वर्षं दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. तिथेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. 2 नोव्हेंबर 2000 रोजी लष्कराला विशेषाधिकार देणारा आणि आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट रद्द करावा यासाठी इरोम यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. सुटका झाली असली तरी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शर्मिला यांनी व्यक्त केला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2014 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close