S M L

ना'पाक' कृत्य सुरूच, सीमारेषेवर गोळीबारात 2 ठार

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2014 12:01 PM IST

ना'पाक' कृत्य सुरूच, सीमारेषेवर गोळीबारात 2 ठार

pak firing23 ऑगस्ट : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापात्या सुरूच आहे. जम्मू काश्मीरच्या सीमाभागात पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळीक केलेली आहे. पाकने आर. एस. पुरा आणि अरानिया सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.

शुक्रवारी रात्रीपासून या दोन सेक्टर्समधल्या 22 पोस्टवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतोय. या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले आहेत तर चार जण जखमी झाले. या जखमींमध्ये एका जवानाचाही समावेश आहे. जखमींना जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलंय. हा गोळीबार अजूनही सुरू आहे.

जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये चकला गावात 60 मीटर लांब सुरूंग सापडली आहे. ही सुरूंग मुनव्वर नदीजवळच्या गावात मिळाली. ही सुरूंग पाक सैनिकांनी दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्यासाठी बनवली असावी असा संशय आहे. भारतीय सैनिकांनी याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

पाककडून होत असलेल्या गोळीबारामुळे सीमारेषेवर असलेल्या गावातील ग्रामस्थांनी घर सोडून शहराकडे धाव घेतली आहे. आर. एस. पुरा सेक्टरमध्ये 6 गावातील लोकांनी गावं सोडली आहे. काही लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या घरात तात्पुरता आसरा घेतला आहे. पाक दररोज गोळीबाराच्या घटनेत वाढ होत आहे अशी माहिती गावकर्‍यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2014 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close