S M L

मध्य प्रदेशात चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Aug 25, 2014 10:38 AM IST

 मध्य प्रदेशात चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू

25 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट गावातल्या कामदगिरी पर्वताची परिक्रमा करत असतांना आज (सोमवार) पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 10 भाविकांचा मृत्यू झाला. यात 5 महिलांचाही समावेश आहे तर 60 भाविक जखमी आहेत.

सतना जिल्ह्यातील मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील चित्रकूट गावत असलेल्या कामदगिरी पर्वताची श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी म्हणजेच सोमवती अमावस्येला परिक्रमा केली जाते. सोमवारी पहाटेपासून भाविकांनी या परिक्रमेसाठी गर्दी केली. ही परिक्रमा लोटांगण घालून केली जाते. मात्र गर्दी जास्त असल्याने परिक्रमेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सुमारे 60 भाविक जखमी झाल्याचे स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2014 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close