S M L

कौन बनेगा अर्थमंत्री ?

15 मे,नव्या सरकारच्या स्थापनेनंतर कोणते मोहरे कोणती जागा पटकावतील हे सांगता येणं कठीण आहे. पण अर्थमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात असेल यावर सर्वाचंच जातीनं लक्ष असेल. कारण जागतिक मंदीचा प्रभाव अजूनही सरलेला नाही. अशातच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वारुवर लगाम कोण घालणार हेही महत्वाचं असेल आणि हा लगाम कोणाच्या हातात असेल यासाठी विविध अंदाज आतापासूनच बांधले जाताहेत. सत्ताबदल होईल की नाही ते आता काही तासातच कळेल. पण नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्रीपद कोणाला मिळेल यावर आतापासूनच शेअरमार्केट आणि कॉर्पोरेटसमध्ये कयास लावले जाताहेत. एनडीएचं सरकार आलं तर निश्चितच यशवंत सिन्हा यांची वर्णी अर्थमंत्रीपदी लागू शकते कारण त्यांचा अर्थमंत्री म्हणून अनुभव मोठा आहे. मोरारजी देसाईनंतर त्यांच्याच नावावर सर्वात जास्त वेळा बजेट सादर करण्याचं रेकॉर्ड आहे. त्यांच्या कार्यकाळात डिसइन्वेस्टमेंट , एक्साइज आणि कस्टम ड्युटीमध्ये लोकांना हवेसे बदल केले गेले. तसंच म्युचुअल फंडंसाठी दर अनिश्चित ठेवण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला. पण यशवंत सिन्हांना जसवंत सिंग यांची स्पर्धा आहे. वाजपेयी सरकारच्या काळात जसवंत सिंग यांनी इन्कम टॅक्स आणि प्रत्यक्ष कराच्या नियमांची फेररचना केली. इन्कम टॅक्स कमी करण्याचं सुख मात्र त्यांनी जनतेला दिलं नव्हतं. अर्थमंत्रीपदासाठी दावेदार म्हणून माजी उद्योग आणि वाणिज्यमंत्री अरुण जेटली यांचंही नाव आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान आणि वाय. व्ही. रेड्डी यांच्या नावांचीही अटकळ बांधली जातेय. तर युपीएचं सरकार आल्यास पुन्हा एकदा पी. चिदम्बरमच अर्थमंत्री होण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्यांच्या कार्यकाळात इन्कम टॅक्स स्लॅब आणि इन्कम टॅक्स दरात मोठे बदल झाले. तसंच फ्रिंज बेनिफिट टॅक्स, सिक्युरिटीज ट्र्‌न्झॅक्शन टॅक्स आणि कमोडिटी ट्र्‌न्झॅक्शन टॅक्सही त्यांनीच सुरू केले. कमलनाथही या शर्यतीत आहेत. सध्याच्या सरकारमध्ये तेच वाणिज्य आणि उद्योग खातं संभाळताहेत. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंह अहलुवालिया यांच्या नावाची शक्यताही नाकारता येत नाही. कारण 1991 पासून 1996 पर्यंत त्यांनी अर्थ सचिव म्हणून आर्थिक बदल सुचवण्यात मोठी भूमिका बजावलीय. तसंच गेल्याच वर्षी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पी. चिदंबरम यांना गृहखात्यात हलवण्यात आलं त्यावेळी अर्थमंत्रीपदाचे वारस म्हणून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात होतं. त्यामुळे यावेळी त्यांच्या नावावरही सर्वांची नजर आहेच. तिसर्‍या आघाडीचं सरकार आल्यास डाव्या पक्षांमधील अनेकजण अर्थमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेतच. पण या आघाडीत बसपाचं संख्याबळ जास्त झाल्यास किंवा जयललिता या आघाडीत सामील झाल्यास अर्थमंत्री कोण होणार, हे सांगता येणं कठीण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2009 04:00 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2009 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close