S M L

काँग्रेस, भाजप करतायत प्रादेशिक पक्षांची मनधरणी

15 मे, नवी दिल्लीसरकार बनवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपला प्रादेशिक पक्षांची मनधरणी करावी लागली आहे. निकाल हाती येण्यासाठी आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस ठरला तो भेटीगाठी आणि फोनवरून संभाषणांचा. आज दिवसभरात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांशी संपर्क साधून आघाड्यांचे खांब मजबूत करण्याचा प्रयत्न केला. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणार्‍या सरकारला पाठिंबा देण्याचे संकेत संयुक्त जनता दलाच्या नितीशकुमार यांनी दिले. काँग्रेसनं त्यांच्या मागणीला तात्काळ अनुकुलता दाखवली. त्यामुळे भाजपलाही हालचाल करावी लागली. सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांची भेट घेतली. करात यांनी जयललिता आणि चंद्राबाबू नायडू यांनाही फोन केला. समाजवादी पक्ष हा आपला नैसर्गिक मित्र असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं. त्यामुळे मायावती यांचा पर्याय सध्यातरी काँग्रेसनं बाजूला ठेवला असल्याचं दिसतं. पंतप्रधानपदाला पाठिंबा मिळवण्यासाठी शरद पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी अमर सिंग, जयललिता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पण काँग्रेसवर नाराज असलेल्या पी. ए. संगमा यांनी भाजप अस्पृश्य नसल्याचं सांगत धक्का दिला. राष्ट्रीय लोकदलाच्या अजित सिंग यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तर, चौथ्या आघाडीच्या रामविलास पासवान यांनी एनडीएचे समन्वयक शरद यादव यांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2009 04:39 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2009 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close