S M L

आता वर्षभरात कधीही अनुदानित 12 सिलेंडर घेऊ शकता !

Sachin Salve | Updated On: Aug 27, 2014 09:07 PM IST

43cylinder-price-hike27 ऑगस्ट : महागाईने होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिलाय. सबसिडीचे 12 सिलेंडर आता वर्षभरात केव्हाही घेता येणार आहेत.

आज केंद्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडलीय. या बैठकीत दर महिन्याला मिळणार्‍या एक सिलेंडरची अट शिथील करण्यात आलीय. लोकांना कधी एका सिलेंडरची आवश्यकता नसते तर कधी गरजेची असते खास करुन उत्सवाच्या काळात सिलेंडरची गरज प्रामुख्याने जाणवते.

त्यामुळे जनतेचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिलीय. आधी एका महिन्यात एकच सिलेंडर मिळण्याची अट होती ती आता शिथील करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2014 09:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close