S M L

आठवले शाहांच्या भेटीला, 13 जागांची केली मागणी

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2014 09:30 PM IST

आठवले शाहांच्या भेटीला, 13 जागांची केली मागणी

athavle meet shah28 ऑगस्ट : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून महायुतीत मात्र अजूनही धुसफूस सुरू असल्याचे चिन्ह आहे. महायुतीचा घटकपक्ष रिपाइंही नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी थेट भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान रिपाइंला राज्यपाल पद द्यावं आणि विधानसभा निवडणुकीत 13 जागांची मागणी आठवलेंनी केली तसंच राज्यसभेच्या 2 जागा आणि काही महामंडळ देण्याची मागणीही आठवलेंनी केली आहे.

महायुतीने रिपाइंला 6 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण जागा कमी देऊन अपमान सहन करणार नाही असा पवित्रा आठवलेंनी घेतलाय. त्यामुळे त्यांनी आता थेट अमित शाह यांचीच भेट घेतली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2014 09:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close