S M L

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना दाखवला मतदारांनी लाल बावटा

16 मे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी डाव्या पक्षांना अखेर लाल बावटा दाखवला आहे. गेल्या तीस वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या घोडदौडीला आता खीळ बसली आहे. कारण ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये निर्णायक जागा मिळवल्या आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वीच काही महिने अगोदर पश्चिम बंगालमध्ये सिंगूर प्रकरणानं चांगलीच उचल खाल्ली होती. त्यानंतर डाव्यांनी तिथला नॅनोचा प्रकल्प उभारण्याचा चंगच बांधला होता. पण त्याविरोधात बॅनर्जी यांनी उभारलेलं आंदोलन यशस्वी तर झालंच, पण त्याचा फायदा त्यांची प्रतिमा सुधारण्यातही झाला. त्यामुळं यावेळच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या मागं पश्चिम बंगालमधली ग्रामीण जनता मोठ्या धाडसानं उभी राहिली.याठिकाणी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी आघाडी करून डाव्यांना चांगलीच टक्कर दिली. डाव्यांनाही अपेक्षित नव्हती अशी लढत इथे पहायला मिळाली. किंबहुना देशातल्या काही प्रमुख नेत्यांचं इथल्या लढतीकडे अगदी बारकाईने लक्ष होतं. गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं होतं. ममता बॅनर्जी यांनी यावेळी मात्र लढवलेल्या 28 जागांपैकी तब्बल 19 जागा आपल्याकडे वळवल्यात. प्रणव मुखर्जी आणि ममता बॅनर्जी यांनी मिळून डाव्यांच्या विरोधात केलेलं राजकारण फळाला आलं असंच या निकालानंतर म्हणावं लागेल. गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्यांना 1984 साली अशाप्रकारेच पराभवाला सामोरं जावं लागत होतं. त्याचा पुन्हा एकदा अनुभव यावेळी डाव्यांना आला. काँग्रेस आणि भाजपविरोधी डाव्यांनी रचलेले मनोरे आजच्या निकालानंतर पत्त्याच्या घरासारखे कोसळले. एकेकाळी केंद्रातलं यूपीए सरकार डाव्यांच्या आधारावर उभं होतं. पण आता मात्र डाव्यांना वगळूनही यूपीए सरकार बनवू शकेल, एवढं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हटवादी डाव्यांना यापुढच्या काळात कोण भाव देणार याकडे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2009 01:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close