S M L

'मोदींचं भाषण दाखवा नाहीतर कारवाईला सामोरं जा'

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2014 10:14 PM IST

'मोदींचं भाषण दाखवा नाहीतर कारवाईला सामोरं जा'

narendra modi and shivraj singh chauhan02 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिक्षकदिनाच्या भाषणावरून आता चांगलाच वाद रंगला आहे. 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाला नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण करणार आहेत. पण ज्या शाळा मोदींच्या भाषणाचं प्रक्षेपण दाखवणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं फर्मान मध्यप्रदेश सरकारनं काढलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौर्‍यावरुन परतल्यानंतर 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनी भाषण करणार आहे. मोदींचं भाषण देशातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत.

मध्यप्रदेशमधील सर्व शाळांनी त्यांच्या वेळापत्रकात बदल करून मोदींचं भाषण लाइव्ह दाखवावं, अशा सूचना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये काही शाळांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत संपतं. पण मोदींचं भाषण दुपारी 3 ते 5 या वेळेत असणार आहे.

विरोधकांना सरकारच्या या भूमिकेवर टीका केलीय. पण आपण केंद्राच्या सूचना पाळणार नाही, असं पश्चिम बंगालच्या सरकारने स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे मध्यप्रदेशमध्ये भाजपचेच सरकार आहे. शिक्षक दिनी दुपारी 3 ते 5 या वेळेत पंतप्रधानांचे भाषण होईल. यानंतर मोदींचं भाषण किती विद्यार्थ्यांनी ऐकलं, याबाबतचा अहवालही केंद्रांने मागितला आहे. इंटरनेटद्वारेही मोदींच्या भाषणाचे प्रक्षेपण केले जाणार आहे, ज्या शाळांमध्ये आयसीटी योजना आहे तिथे प्रोजेक्टर्सचा वापर करण्याच्या सूचना आहेत. तर दुर्गम भागात रेडिओद्वारे प्रसारण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2014 10:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close