S M L

'राहुल गांधींना पराभवाला जबाबदार धरू नका'

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2014 10:44 PM IST

76rahul_gandhi03 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आणि या पराभवाचं खापरं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या फोडण्यात आलं. काही काँग्रेस नेत्यांनी तर राहुल गांधींना पदावरुन हटवा असा सूरच लगावला. पण आता पक्षातील तरूण कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना पराभवाला जबाबदार धरू नका असं पाठराखण करणार पत्रच दस्तरखुद्द राहुल यांना लिहलंय.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये नव्या जुन्यांचा वाद वाढत चाललाय. काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पाठिंबा देणारं एक पत्र लिहिलंय.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी राहुल गांधींना दोष देता येणार नाही, असं या पत्रात म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

हे पत्र लवकरच पक्षातल्या सर्व नेत्यांना पाठवण्यात येणार आहे. पराभवासाठी राहुल गांधींना जबाबदार धरण्यापेक्षा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. पक्ष नेत्यांनी आपली नाराजी पक्षाच्या व्यासपीठावर मांडावी, सार्वजनिक ठिकाणी नाही, असंही मत या पत्रात मांडण्यात आल्याचं कळतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 09:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close