S M L

मोदी सरांचा वर्ग ऐच्छिक

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2014 12:43 PM IST

pm modi 5 sep speech05 सप्टेंबर : आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मात्र, पंतप्रधानांचे भाषण पाहणं किंवा ऐकणं ऐच्छिक आहे असं आता स्पष्ट झालंय. त्यासंदर्भात शिक्षणविभागाने एक परिपत्रक काढून सर्व शिक्षण अधिकार्‍यांना आदेश दिले आहे. त्यामुळे मोदी सरांचा वर्ग आता ऐच्छिक झालाय.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सर्व शाळेमध्ये दाखवण्यात यावं असं फर्मान केंद्र सरकारने काढला होता.

सर्व शाळेमध्ये मोदींचं भाषण दाखवण्यात यावं आणि जर कुणी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी गैरहजर राहिला तर त्याची यादी पाठवण्यात यावी असे आदेशही देण्यात आले होते. मात्र केंद्राच्या या आदेशावर विरोधकांनी कडाडून टीका केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सरकारने भाषणाची सक्ती बाळगणार नाही असं स्पष्ट केलं. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसशासित राज्यातही विरोध होत आहे. अखेरीस वाढता विरोध पाहता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं आता माघार घेतलीये. मोदींचं भाषण पाहणं किंवा ऐकणं ऐच्छिक आहे. उपलब्ध सोयींनुसारच निर्णय घेण्यात यावा असं या आदेशात म्हटलं आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फोनवरून याबद्दलचं स्पष्टीकरण दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अखेर हे परिपत्रक प्रसिद्ध केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2014 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close