S M L

काँग्रेसच्या सत्तास्थापनेसाठी राहुल यांची दिल्लीत बैठक

17 मे,राहुल गांधीनी आज सकाळपासून पक्ष कार्यकर्ते आणि खासदारांशी भेटीगाठी सुरू केल्यात. एकीकडे सोनिया गांधी सत्ता स्थापनेसाठी खासदारांची जमवाजमव करताना आघाड्यांशी चर्चा करत आहेत. तर राहुल गांधी यांनी सत्ता स्थापनेसाठी लागणार्‍या 12 जागांसाठी कुणाचा पाठिंबा घ्यायचा याची चर्चा सुरू केली आहे.सध्या दिल्लीत काँग्रेसच्या सत्तास्थापनेसंदर्भात एक बैठक सुरू आहे. राहुल गांधी या बैठकीला उपस्थित आहेत.काँग्रेसच्या या विजयाचे हिरो आहेत...काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी ! काँग्रेसच्या विजयात राहुल गांधींचा मोठा वाटा असल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलंय. तरुणांना काँग्रेसकडे वळवण्यात राहुल यशस्वी ठरल्याचं पायलट यांनी म्हटलंय. राहुल गांधींनी केलेलं काम आणि त्यांच्या ठाम धोरणामुळेच काँग्रेसला यश मिळालं, असं सटिर्फिकेट काँग्रेसच्या बुजुर्ग नेत्यांनी दिलंय. विजयाचं श्रेय राहुल किंवा प्रियंका गांधींना नाही तर ते टीमवर्कला आहे,अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. घराणेशाही चालवणारा युवराज, अपरिपक्व नेता अशी टीका करणार्‍या विरोधकांची तोंडं राहुल गांधींनी या निवडणुकीच्या निकालातून गप्प केली आहेत. खरं तर या 'आम आदमी'च्या सोबत्याला मतदारांनी कौल दिला आहे.काँग्रेसचं सरचिटणीसपद मिळालेल्या राहुल गांधींनी उच्चशिक्षित युवा कार्यकर्त्यांची फळी बांधायला सुरुवात केली. आणि सोबतच गांधी कुटुंबाच्या कर्मभूमीत उत्तर प्रदेशात काम करायला सुरुवात केली, तेव्हा विरोधकांनी त्यांना हसण्यावारी नेलं. रोजगार हमी योजनेवर मजुरांसोबत काम करणं असो, की दलित किंवा गोरगरिबाच्या झोपडीत जाणं असो, राहुलची प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाला आपलंसं करणारी होती. गेल्या काही दिवसात देशानं राहुल गांधींमधला कणखर नेता पाहिला. विशेषत: अणुकरारावर संसदेत त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचं कौतुक झालं. अगदी गेल्या काही दिवसात यूपीए आघाडीची जुळवाजुळव सुरू करून राहुलनी राजकीय परिपक्वता दाखवली. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अनेकदा त्यांच्या नावाची चर्चा झाली. पण 'पंतप्रधान मनमोहन सिंगच होतील',असं ठामपणे सांगत त्यांनी वेळोवेळी विनम्रता दाखवली आहे. तसंच काँग्रेसच्या विजयाचं श्रेयंही राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या टीमवर्कला दिल्याचं समजतंय. लोकशाहीत नेत्याला जनाधार आणि सर्वमान्यता मिळते ती निवडणुकीतून. आणि राहुल यांना ती या निवडणुकीतून मिळाली आहे. उत्तर प्रदेश या सपा, बसपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे तब्बल 20 हून अधिक खासदार त्यांनी निवडून आणले आहेत. या यशामुळे राहुल गांधीचा पुढच्या राजकीय प्रवासासाठीचा महामार्ग नक्कीच रुंदावला गेला आहे. आता सत्तास्थापनेच्या कामिगरीत राहुल गांधी काय पाऊलं उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2009 08:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2009 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close