S M L

दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2014 02:02 PM IST

DELHI_ASSEMBLY_1739449f05 सप्टेंबर : दिल्लीचे तख्त अजून ही रिकामेच आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी पत्र पाठवले आहे. या पत्रात भाजपशी चर्चा सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. राष्ट्रपतींनी यावर गृहमंत्रालयाचं मत मागितलं आहे. याबाबत गृहमंत्रालय भाजपसाठी शिफारस करण्याची शक्यता आहे.

दिल्लीत सरकार बनवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तडकाफडकी सत्ता त्याग करून लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकूनही सरकार स्थापन करता आले नाही. बहुमतासाठी लागणार 36 चा आकडा गाठणं भाजपला शक्य झालं नाही. आता पुन्हा एकदा दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू झालीये. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे यासाठी परवानगी मागितली आहे. तर राष्ट्रपतींनी गृहमंत्रालयाकडे याबाबत विचारणा केलीये. नायब राज्यपालांनी भाजपशी चर्चा करण्यावर केंद्र सरकारला काही हरकत नाही अशी शिफारस गृह मंत्रालय करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दिल्लीचे भाजप प्रभारी नितीन गडकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्यायही त्यांच्यासोबत होते. भाजपकडे 32 जागा आहेत त्यामुळे बहुमताचा 36 जागा दाखवणे गरजेचं आहे. दुसरीकडे आपमधून बाहेर पडलेले आमदार विनोद कुमार बिन्नी, अपक्ष आमदार रामबीर शौकीन आणि शोयब इकबाल भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर असं झालं तर भाजपची संख्या 35 होईल. दिल्लीत पुन्हा निवडणूक घेण्यावर कोणत्याही पक्षाचं अजून एकमत झालं नाही. जर पुन्हा निवडणूक झाली तर हातच्या जागाही निघून जातील अशी भीती सर्वच पक्षांना आहे. त्यामुळे दिल्लीत आता भाजप तडजोडीचं राजकारण करून सत्ता स्थापन करते का हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2014 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close