S M L

जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचे थैमान, 70 जणांचा बळी

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2014 02:05 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचे थैमान, 70 जणांचा बळी

05 सप्टेंबर : जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 2 दिवसांत पावसाच्या तडाख्यामुळे 70 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातलंय. गुरुवारी राजौरी जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर श्रीनगर, अनंतनाग, पुलवामा आणि पूँछ जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पूर आलाय. तर दरड कोसळून श्रीनगर-जम्मू आणि श्रीनगर-लेह हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2014 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close