S M L

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये अणुकरार, 'युरेनियम'चा मार्ग मोकळा

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2014 11:06 PM IST

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये अणुकरार, 'युरेनियम'चा मार्ग मोकळा

pm modi and TonyAbbott05 सप्टेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नागरी अणुकरारावर सह्या झाल्या आहेत. या करारामुळे भारताला आता ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम आयात करता येईल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अणुकरारासह चार महत्वाच्या क्षेत्रांवर करार झाला आहे. यामध्ये शिक्षण, खेळ आणि विज्ञानाचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबट भारत दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोदींनी या करारामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास व्यक्त केलाय. आज ऍबट यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली होती.

दरम्यान, मोदी यांनी ऑस्ट्रेलियाला भेट देण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या नोव्हेंबर महिन्यात मोदी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार आहे. 1984 नंतर ऑस्ट्रेलियाला भेट देणार मोदी हे पहिलेच पंतप्रधान असणार आहेत. मोदी यांच्या भेटीमुळे दोन्ही देशातील मैत्रीला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास टोनी ऍबट यांनी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2014 10:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close