S M L

दिल्लीचे तख्त आता भाजप राखणार ?

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2014 10:31 PM IST

India Elections06 सप्टेंबर : दिल्लीत सरकार स्थापनेची तयारी भाजपने सुरू केल्याचं दिसतंय. विधानसभेतल्या सर्वात मोठ्या पक्षाशी बोलणी सुरू करण्यासाठी दिल्लीच्या नायब राज्यपाल नजीब जंग यांनी परवानगी मागितलीय. दिल्लीत सरकार स्थापनेबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील. पण भाजपनं अजून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीत सरकार बनवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकूनही सरकार स्थापन करता आले नाही. बहुमतासाठी लागणार 36 चा आकडा गाठणं भाजपला शक्य झालं नाही. आता पुन्हा एकदा दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू झालीये.

शुक्रवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे यासाठी परवानगी मागितली. तर राष्ट्रपतींनी गृहमंत्रालयाकडे याबाबत विचारणा केलीये. नायब राज्यपालांनी भाजपशी चर्चा करण्यावर केंद्र सरकारला काही हरकत नाही अशी शिफारस गृह मंत्रालय करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दिल्लीचे भाजप प्रभारी नितीन गडकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नायब राज्यपालांचा अहवाल माझ्यापर्यंत पोहोचला आहे. सरकार स्थापन करायचं की नाही हा पक्षाचा निर्णय असेल अशी प्रतिक्रिया सिंग यांनी दिलीय.

तर दुसरीकडे सगळ्या पर्यायांची चर्चा होत आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत घोडेबाजार करणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.

भाजपकडे 32 जागा आहेत त्यामुळे बहुमताचा 36 जागा दाखवणे गरजेचं आहे. दुसरीकडे आपमधून बाहेर पडलेले आमदार विनोद कुमार बिन्नी, अपक्ष आमदार रामबीर शौकीन आणि शोयब इकबाल भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर असं झालं तर भाजपची संख्या 35 होईल. दिल्लीत पुन्हा निवडणूक घेण्यावर कोणत्याही पक्षाचं अजून एकमत झालं नाही. जर पुन्हा निवडणूक झाली तर हातच्या जागाही निघून जातील अशी भीती सर्वच पक्षांना आहे. त्यामुळे दिल्लीत आता भाजप तडजोडीचं राजकारण करून सत्ता स्थापन करते का हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2014 08:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close