S M L

जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार, 100 पेक्षा जास्त बळी

Sachin Salve | Updated On: Sep 6, 2014 04:35 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार, 100 पेक्षा जास्त बळी

06 सप्टेंबर :जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. पावसाने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त बळी घेतले आहे. राज्यभरातील सर्व नद्यांना पूर आले आहे. झेलम नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगर शहरात रेड ऍलर्ट जारी करण्यात आलाय.

जम्मू आणि काश्मीरवर अस्मानी संकटाने कहर केलाय. गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. नद्या-नाल्यांनी रौद्ररुप धारण केलंय. तवी नदीच्या तडाख्यामुळे अनेक लोकांची घर वाहून गेलीये. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना रस्त्यावर बस्तान मांडावे लागले आहे. अनेक जण उरलं सुरलेलं साहित्य घेऊन सुरक्षीत ठिकाणी आसरा घेत आहे. महापूर आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा 144 वर पोहचलाय. लष्काराचे जवान, एनडीआरएफची टीम आणि स्थानिक पोलीस बचावकार्य करत आहे. अखनूर सेक्टमध्ये जवानांनी 1 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहही आज पुरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. कात्राकडे जाणार्‍या सगळ्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून एनडीआरएफ श्रीनगर आणि जम्मूला बचावासाठी टीम्स पाठवणार आहे.

श्रीनगरमध्ये रेड अलर्ट, शाळा, कॉलेज बंद

श्रीनगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटीमध्ये झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रौद्ररुप धारण केलंय. झेलम नदीने पुलवामामध्ये हाहाकार उडवला आहे. त्यामुळे दक्षिण श्रीनगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.शहरातील हॉस्पिटल, शाळा, कॉलेज अनेक शासकीय इमारतीत पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत शाळा,कॉलेजना सुट्टी देण्यात आलीये. माता वैष्णोदेवी समितीनेही भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन केलंय. दक्षिण काश्मीरमध्ये 30-35 गावांना पुराचा तडाखा बसला. हवामान खात्याने अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचं अंदाज व्यक्त केलाय.

पुलवाममध्ये नऊ जवान वाहून गेले

पुलवाममध्ये बचावकार्य करणारे 9 जवान वाहून गेले आहे. या नऊ जवानांचा शोध घेतला जात आहे. जम्मू-काश्मीरची परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या दोन टीम आज भटिंडा येथून घाटी येथे पाठवण्यात आल्या आहेत. तसंच मिळालेल्या माहितीनुसार एनडीआरएफची आणखी एक टीम जम्मू आणि श्रीनगरकडे रवाना झालीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2014 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close