S M L

दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी भाजप सज्ज

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2014 01:05 AM IST

India Elections07 सप्टेंबर : आपण दिल्लीत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत आणि आपला विजय निश्चित आहे असं भाजपनं आज स्पष्ट केलंय. भाजप निवडणूक लढवण्यासाठी घाबरत असल्याची टीका काँग्रेसनं केली होती त्यावर भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. तसंच नायब राज्यपालांनी आमंत्रण दिलं तर सरकार स्थापन करण्याची तयारी असल्याचंही भाजपनं सांगितलंय.

शुक्रवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे यासाठी परवानगी मागितली. तर राष्ट्रपतींनी गृहमंत्रालयाकडे याबाबत विचारणा केलीये. नायब राज्यपालांनी भाजपशी चर्चा करण्यावर केंद्र सरकारला काही हरकत नाही अशी शिफारस गृह मंत्रालय करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दिल्लीचे भाजप प्रभारी नितीन गडकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नायब राज्यपालांचा अहवाल माझ्यापर्यंत पोहोचला आहे. सरकार स्थापन करायचं की नाही हा पक्षाचा निर्णय असेल अशी प्रतिक्रिया सिंग यांनी दिलीय.

तर दुसरीकडे सगळ्या पर्यायांची चर्चा होत आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत घोडेबाजार करणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2014 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close