S M L

पूरग्रस्त जम्मू काश्मीरला केंद्र सरकारकडून 1000 कोटी रुपयांची मदत

Samruddha Bhambure | Updated On: Sep 7, 2014 08:25 PM IST

पूरग्रस्त जम्मू काश्मीरला केंद्र सरकारकडून 1000 कोटी रुपयांची मदत

modi kashmir

07 सप्टेंबर :   पुराने थैमान घातलेल्या जम्मू काश्मीरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. ही आपत्ती फक्त जम्मू - काश्मीरची नसून संपूर्ण देश जम्मू काश्मीरवासियांसोबत आहे असं आश्वासनही मोदींनी दिले आहे.

पुराचा फटका बसलेल्या जम्मू काश्मीरच्या परिस्थितीची आढावा घेण्यासाठी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौर्‍यावर गेले होते. पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केल्यावर जम्मू काश्मीर पूराला राष्ट्रीय आपत्ती असल्याचे सांगितले. जम्मू काश्मीरमधील पुनर्वसन कार्याला प्राधान्य दिले जाईल असे मोदींनी सांगितले. महाराष्ट्र- गुजरातमधून एअरलिफ्टेड बोट मागवण्यात आल्या असून लेह लडाखमधील लोकांसाठी मदत पोहोचवण्यासाठीही केंद्र सरकार उपाययोजना करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. ही आपत्ती फक्त जम्मू-काश्मीरची नसून संपूर्ण देश जम्मू काश्मीरवासियांसोबत आहे, असंही ते म्हणाले. राज्य सचिवालय आणि श्रीनगरमधला मुख्य चौक असलेला लाल चौक पूर्णपणे पाण्याखाली आहे. जी. बी. पंत हॉस्पिटलच्या तळमजल्यातही पाणी शिरले आहे.

त्यामुळे तिथे दाखल करण्यात आलेल्या 300 पेशन्ट्सचेही हाल होत आहेत. दरम्यान,राज्यातील सगळे महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर पूल, वीजेचे खांब आणि झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच NDRFनं 6 अतिरिक्त टीम्स पाठवल्या आहेत. बचावकार्यात सैन्य आणि हवाई दलाचीही मदत घेतली जाते आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2014 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close