S M L

केंद्रीय मंत्रिमंडळात विलासराव देशमुखांचीही वर्णी लागण्याची शक्यता

18 मे,नव्या सरकारच्या स्थापनेसाठी काँग्रेस खासदारांची जमवाजमव करण्याच्या तयारीत आहे. त्यामधे सुशील कुमार शिंदे, मुकुल वासनिक, गुरूदास कामत, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा या काँग्रेसच्या खासदारांसोबत विलासराव देशमुख यांचीही वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मात्र मुरली देवरा, विलास मुत्तेमवार, यांचा पत्ता कट होण्याचीही शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.मावळत्या मंत्रिमंडळात राज्यातले 10 मंत्री होते. पण ए.आर.अंतुले आणि सूर्यकांता पाटील यांचा पराभव झाल्यामुळे त्यांचं नाव आपोआप गळलं आहे. त्याचबरोबर शिवराज पाटील आणि माणिकराव गावित यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे त्यांची नावं चर्चेतून बाद झाली आहेत. राज्यात काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जुन्या चेहर्‍यांबरोबरच काँग्रेसकडून काही नवीन चेहर्‍यांना वाव मिळेल असं सांगण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून शरद पवारांबरोबरच प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे.काँग्रेस सत्तास्थापनेसाठी खासदारांची निवड करताना युपीएच्या जुन्या मित्रांनाच प्राधान्य देईल की, लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश साधता न आलेल्या इतर पक्षातील नेत्यांनाही मंत्रिपद मिळण्याची संधी देईल, हे लवकरच ठरेल .

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2009 06:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2009 06:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close