S M L

15 व्या लोकसभेत गांधी विरोधात गांधी

18 मे, नेहरू-गांधी परिवाराचे चार वारसदार 15 व्या लोकसभेत पोहचलेत. देशातील ही पहिलीच घटना आहे. अर्थात यातील काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसलेले दिसतील. तर गांधी परिवाचे दुसरे 2 सदस्य मनेका गांधी आणि वरूण गांधी विरोधी बाकावर बसतील. 1952 साली प्रथमच जवाहरलाल नेहरू लोकसभेत पोहचले. त्यांच्या परिवाराचा प्रभाव आजही भारतीय समाजावर कायम राहिलाय. आजचे चारही गांधी याच नेहरू-गांधी परिवाराचा वारसा सांगताहेत. याआधी नेहरू गांधी आणि त्यांचे जावई फिरोज गांधी सोबत होते. त्यानंतर इंदिरा गांधी आणि संजय गांधी संसदेत एकत्र होते. यावेळी प्रथमच या परिवारचे 4 सदस्य आपल्याला लोकसभेत दिसणार आहेत. मात्र ते असतील एकमेकांच्या विरोधात. 15 व्या लोकसभेत गांधी घराण्याच्या सुनबाई आपल्या मुलांसोबत विरूध्द टोकाला बसतील. राहुल आणि वरूण या दोघांना पुढे करण्यात त्या दोघांच्या आईची महत्वकांक्षा दिसून येते. वरुण यांचा विचार केला तर ते वादात सापडलेले दिसताहेत. तर राहुल गांधी पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून चर्चेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2009 12:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2009 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close