S M L

मीडियाच्या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा येणार नाही - प्रकाश जावडेकर

Samruddha Bhambure | Updated On: Sep 11, 2014 04:06 PM IST

मीडियाच्या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा येणार नाही - प्रकाश जावडेकर

11 सप्टेंबर : मीडियाच्या स्वातंत्र्यावर कुणालाही टाच आणू देणार नाही पण स्वातंत्र्य हे जबाबदारीसोबत येत म्हणून मीडियानेही जबाबदारीनं वागलं पाहिजे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

तेलंगणामध्ये 16 जूनपासून दोन टीव्ही चॅनल्सचं प्रक्षेपण पूर्णपणे बंद करण्यात आले असून या चॅनल्सनी तेलंगणाविषयी आक्षेपार्ह बातम्या केल्याचा आरोप तेलंगण सरकारने केला आहे. या कारवाईचे समर्थन करताना चंद्रशेखर यांनी मीडियावर जोरदार टीका केली.'जर या मीडियावाल्यांनी अशाच पद्धतीनं तेलंगणाचा अपमान केला त्यांना जमिनीच्या 10 फूट खाली गाडून टाकू' असंही ते म्हणाले. त्यावर मीडियाच्या स्वातंत्र्यावर कुणालाही टाच आणू देणार नाही, अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पण स्वातंत्र्य हे जबाबदारीसोबत येत म्हणून मीडियाने जबाबदारीने वागले पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2014 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close