S M L

काश्मीरमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात

Samruddha Bhambure | Updated On: Sep 14, 2014 04:41 PM IST

काश्मीरमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात

14 सप्टेंबर :  पुरग्रस्त काश्मीर खोर्‍यात आज (रविवार) सकाळपासून पुन्हा एकादा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या जवानांनी सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले होते. पण, आज सकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागली आहे. आणि त्यामुळे प्रशासनाच्या समस्या पुन्हा वाढण्याची चिन्हं आहेत. अनेक नागरिकांनी रस्त्यावरच आश्रय घेतला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी ओसरण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे बचावकार्यात वेग आला होता. पुराच्या पाण्यामुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. काश्मीर खोर्‍यात आतापर्यंत पावसामुळे सुमारे 200 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तब्बल दिड लाख लोकं अजूनही अडकले असून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन आज श्रीनगरला भेट देणारे आहेत. जम्मू श्रीनगर महामार्ग पुन्हा सुरू होण्यासाठी किमान 4 दिवस लागतील अशी माहिती आर्मीने दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2014 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close