S M L

भाजपची दिल्लीतली बैठक निष्फळ, उद्या मुंबईत चर्चा

Samruddha Bhambure | Updated On: Sep 16, 2014 03:36 PM IST

भाजपची दिल्लीतली बैठक निष्फळ, उद्या मुंबईत चर्चा

16 सप्टेंबर :  महायुतीतला जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटत नाहीये. एकीकडे भाजपचा 135 जागांचा आग्रह कायम आहे तर शिवसेनेनं 135 जागा द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे यापुढची वाटचाल काय असावी यावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे उद्या पुन्हा मुंबईत चर्चा होणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रवींद्र भुसारी हे नेते हजर होते.

भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार शिवसेना जागावाटपाला तयार नसल्याने भाजपची पुढची रणनीती काय असावी यासाठी राज्यातल्या नेत्यांनी नितीन गडकरींशी चर्चा केली. दिल्लीतले नेते अमित शहा आणि नितीन गडकरी मुंबईत येणार आहेत. यावेळी चर्चेतून मार्ग काढला जाईल, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा 17 ते 19 सप्टेंबरमध्ये तीन दिवस राज्याच्या दौर्‍यावर येत आहेत. यावेळी ते उद्धव यांच्यासोबत जागावाटपाबाबत अंतिम बोलणी करतील आणि तिढा सोडवला जाईल, असं कळतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2014 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close