S M L

युती तुटली नाही पाहिजे, मोदींचा आदेश

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2014 04:56 PM IST

युती तुटली नाही पाहिजे, मोदींचा आदेश

22 सप्टेंबर : युती तुटणार की टिकणार यावरून सुरू असलेला वाद आता शिगेला पोहचला आहे. शिवसेनेनं अखेरचा प्रस्ताव देऊन हात वर केले आहे. मात्र या वादात आता खुद्द भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करावा लागला आहे. युती तुटू देऊ नका असा निरोप मोदींनी पाठवला आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मीडियाला ही माहिती दिली.

युती टिकवण्यासाठी आता हा अखेरचा प्रयत्न आहे असं सांगून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसमोर 151 -119-18 जागांचा अखेरचा प्रस्ताव ठेवला. मात्र भाजपने हा प्रस्ताव अमान्य असल्याचं सांगितलं. पण या जागावाटपाचा तिढा हा दिल्ली दरबारी पोहचलाय. भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेत्यांनी युती टिकवण्यावर भर द्यावा अशीच भूमिका घ्यायला सांगितलं अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. तसंच राज्यातील भाजपचे नेते जो काही निर्णय घेतील तो भाजपचे अध्यक्ष आणि मोदींना सांगूनच घेण्यात येईल आणि त्याला त्यांची सहमती असणार आहे असंही खडसे म्हणाले. दरम्यान, रविवारी रात्री भाजप संसदीय समितीची झालेली बैठक कोणत्याही तोडग्याविना संपली. भाजपची 130 नावांची यादी तयार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. पण यावर अंतिम निर्णय अमित शाह घेणार आहेत. भाजपचे नेते आज मुंबईत दाखल झाले आहे. आज संध्याकाळी भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2014 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close