S M L

आघाडी टिकणार की तुटणार ?, काँग्रेसकडूनही स्वबळाची चाचपणी

Sachin Salve | Updated On: Sep 22, 2014 04:06 PM IST

soina gandhi and pawar22 सप्टेंबर : आघाडीत जागावाटपावरुन सुरू असलेली रस्सीखेच आता तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या धमकीनंतर काँग्रेसनेही स्वबळावर लढण्यासाठी बाह्या वर सरसावल्या आहेत. काँग्रेसने सर्व 288 जागांवर लढण्याची तयारी चालवली असून दिल्ली दरबारी यावर चर्चा झाली आहे मात्र अजून निर्णय गुलदस्त्यातच ठेवण्यात आलाय.

निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली खरी पण जागावाटपाचं गाडं रुतल्यामुळे आघाडीच्या प्रचाराचं नारळ फुटून सुद्धा प्रचार थंड पडलाय. राष्ट्रवादीने 144 जागावर ठाम राहत मागे हटणार नाही असा इशाराच दिलाय. एवढेच नाहीतर राष्ट्रवादीने थेट दोन दिवसांची मुदतच

दिली होती. पण अजूनही काँग्रेसने यावर कोणताही निर्णय घेतला नाही. जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत संपूर्ण 288 जागांवर आपण लढू शकतो याचा आढावा घेण्यात आला. पण आघाडीबाबत सोनिया गांधी अंतिम निर्णय घेतील असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, काँग्रेसची पहिली यादीही आज जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची कोअर कमिटीचीही आज मुंबईत बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सर्व महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडी टिकते तुटते हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2014 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close