S M L

...आणि वाघाने त्याला ठार मारले

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2014 06:07 PM IST

...आणि वाघाने त्याला ठार मारले

23 सप्टेंबर : वाघाचं नाव जरी घेतलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो पण दिल्लीत एका तरूणाला वाघाला जवळून पाहण्याचा मोह जीवावर बेतला. वाघाने केलेल्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. मकसूद (20) असं या तरुणाचं नाव होतं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

घडलेली हकीकत अशी की, दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात दुपारी 2.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे प्राणी पाहण्यासाठी वर्दळ होती. अचानक एक तरूण वाघाच्या पिंजर्‍या पडल्याचं आढळून आलं. प्रत्यक्षदशीर्ंनी दिलेल्या माहिती नुसार, हा विद्यार्थी या वाघाच्या पिंजर्‍याच्या अगदी जवळ उभा होता. अचानक त्याच तोल गेला आणि तो थेट वाघाच्या पिंजर्‍यात पडला. पट्टेरी वाघ त्याच्या समोर येऊन उभा ठाकला. वाघाला जवळ पाहून त्याचा थरकाप उडाला आणि गोठलेल्या अवस्थेत तो वाघासमोर शांत बसला होता. वाघही त्यांच्या समोर येऊन काही वेळ उभा होता. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी वाघाला हुसकावून लावण्यासाठी दगडं मारली. त्यामुळे चवताळलेल्या वाघाने मकसूदवर हल्ला केला. त्याची मान जबड्यात पकडून त्याला ठार मारलं. मकसूदला ठार मारल्यानंतर त्यांचा मृतदेह वाघ आपल्या पिंजर्‍यात घेऊन गेला. धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रसंग घडत असताना तिथले सुरक्षारक्षकही या मकसूदला वाचवायला आले नाहीत, असं प्रत्यक्षदशीर्ंचं म्हणणं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close