S M L

शिवस्मारक समितीत बाबासाहेब पुरंदरे यांचा समावेश करण्यावरुन वाद

26 मार्च, मुंबईमुंबईजवळ समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीवरुन वाद निर्माण झाला आहे. या समितीत बाबासाहेब पुरंदरे यांना घेऊ नये म्हणून मराठासेवा संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र राज्य सरकार शिवस्मारक समितीत पुरंदरेंचा समावेश करण्याबद्दल ठाम आहे. वर्षा बंगल्यावर होणार्‍या बैठकीसाठी राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना आमंत्रण दिलं आहे. मराठा सेवा संघाने पुरंदरे यांच्या नावाला आक्षेप घेताना मारझोडीची भाषा केली आहे. विरोध करणार्‍यांशी सामंजस्याने चर्चा करु असं सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.शिवस्मारक उभारण्यासाठी राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यातही आर्किटेक्ट आणि डेव्हलपर्सना द्यायला सुरूवातीची रक्कम म्हणून 10 कोटी रूपयांना कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात बैठकीत चर्चा होईल. दरम्यान विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या स्मारकाचा कोनशीला समारंभ व्हावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. केवळ छत्रपतींचा पुतळाच नाही, तर उभारण्यात येणारं 10 एकरचं बेट हे पर्यटन केंद्रही व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यासाठी लेझर शोच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग दाखवले जाणार आहेत. हे प्रसंग निवडण्यासाठी ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गेल्या बैठकीत दिले होते. त्यामुळे पुरंदरेंना आमंत्रण देण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2009 09:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2009 09:27 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close